Nitin Raut Saam Tv
महाराष्ट्र

राज्यावर कोसळणार मोठं वीजसंकट; खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

लोकांनी पैसे भरले तर बाहेरून वीज खरेदी करता येईल

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - देशात कोळसा संकट आहे. तर राज्यात फक्त २ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळं राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक असल्याने वीज पुरवठ्याची समस्या राज्यात निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राने कोळसा उपलब्ध करून नाही दिला तर, मोठं वीजसंकट कोसळणार, असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

नितीन राऊत म्हणाले की, 'अनेक राज्यांत लोडशेडिंग सुरू आहे. आपल्याकडे सुद्धा काही प्रमाणात ते करावेच लागेल यात शंका नाही. उष्णता वाढत आहे, त्यामुळं विजेची मागणी देखील वाढली आहे. लोडशेडिंग आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र लोडशेडिंग किमान असेल. वीज दरवाढ बाबत बोलताना नितीन राऊत म्हणाले की, राज्यात फक्त २ दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा शिल्लक आहे. दरवर्षाला वीजदरात काही प्रमाणात वाढ होते, मात्र त्यात फारसा फरक दिसणार नाही. अजून दरवाढीबाबत निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच याबाबत स्पष्टता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोडशेडिंग सुरू आहे हे मान्य आहे. मात्र दुसरीकडे वीज चोरीच्या घटना देखील घडत आहेत. हे इथं येण्यापूर्वी मी आढावा घेतला. मागणी आणि पुरवठा समतोल राखण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तरीसुद्धा लोडशेंडीग अटळ आहे. लोकांनी पैसे भरले तर, बाहेरून वीज खरेदी करता येईल, असे देखील नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

राऊत म्हणाले, कोळसा उपलब्धता कमी आहे, विजेसाठी पाणी नाही. त्यामुळं हायड्रो विषय आता संपला आहे, आता फक्त थर्मलवरच अवलंबून राहावे लागणार आहे. कोळसा आणि वीज पुरवठ्याबाबत उद्या पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं आमचं नियोजन सुरू आहे. कोल इंडिया शेटजी सारखं काम करत आहे. पैसे द्या, व्याज द्या असे ते बोलत आहेत हे योग्य नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT