will pm modi listen mann ki baat of maratha samaj asks maratha kranti morcha saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाची मन की बात कधी ऐकणार? मराठा क्रांती माेर्चा

पंतप्रधान नरेंद्र माेदी मन की बात मधून दहा वर्ष झाले बोलत आहेत.

भारत नागणे

Pandharpur News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मराठा समाजाची आरक्षण (maratha reservation) बद्दलची मन की बात ऐकून घ्यावी अन्यथा मराठा समाज आगामी लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून त्यांची मन की बात ऐकवेल असा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाचे (maratha kranti morcha) राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी दिला आहे. ते पंढरपूर येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

सुनील नागणे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा (maratha reservation) प्रश्न अवघ्या काही दिवसात मार्गी लागेल. ते मन की बात मधून दहा वर्ष झाले बोलत आहेत. पण आमच्या मराठा आरक्षण बद्दल का बोलत नाही.

आमचा आरक्षणचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. मोदींनी मनावर घेतले तर आरक्षण मिळू शकते. त्यांनी आमची मन की बात ऐकली नाही तर मग मराठा समाज २०२४ मध्ये त्यांची मन की बात मत पेटी मधून दाखवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील नागणे यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT