Will Pankaja Munde and Dhananjay Munde get together  Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde & Dhananjay Munde: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार? संघर्ष संपल्याची दिली कबुली

Beed Politics News : महाराष्ट्रातील राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली.

विनोद जिरे

Pankaja Munde and Dhanajay Munde News : महाराष्ट्रातील राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली. गेल्या ७ वर्षांपासून भगवान गडापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडेंनी आज भगवानगड परिसरात हजेरी लावली. भगवान गडाच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे यांनी उपस्थित दर्शवली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे राजकीय शत्रू आणि भाऊ असलेले धनंजय मुंडे हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. (Latest Marathi News)

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून दुरावा निर्माण झाला होता. तो आजच्या कार्यक्रमातून मिटल्याचे दिसून आले. तसेच राजकारणातली लढाई विचारांची आहे. मात्र गडाच्या विकासासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.

संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरुन दोघांनी घोषणा केली. याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे. असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. (Breaking Marathi News)

धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं, दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा शक्ती सारखी आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) धनंजय मुंडेचं कौतुक केलं.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर धनंजय मुंडे उभा राहिले. आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं अशी कबुली दिली. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसव दूर असली तरी चालेल पण घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं, असं म्हणत गडाच्या वादावर ती पूर्णविराम दिला.

मोठा भाऊ या नात्याने लहान बहिणीने जे भगवानगडासाठी करायला सांगितलं आहे ते मी सर्व करेल. आमच्या विचाराच्या वाटण्या आहेत, आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही, या राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत. असं म्हणत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) संघर्षाला पूर्णविराम दिला.

दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून सत्ता संघर्षात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले होते. तसेच आमच्या दोघात बहिण भावांचे नाते काहीच उरले नाही, असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. (Maharashtra Political News)

मात्र भगवानगडाच्या पायथ्याशी हजारो भाविक भक्तांच्या समोर आज पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे मनोमिलन झाल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकत्रित येण्याचे संकेत नव्या राजकारणाची नांदी दाखवून देत आहेत. त्यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे असे असणारे हे बहीण भाऊ एकत्र येणार का ? हे येणारा काळच दाखवून देईल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT