Manikrao Kokate online game controversy video Saam TV news Marathi
महाराष्ट्र

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Manikrao Will Kokate resign : विरोधकांनी ५ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत थेट राज्यपालांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळातील गळती टाळण्यासाठी सरकारकडून संयमित पावलं उचलली जात आहेत.

Namdeo Kumbhar

  • माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोरात लावली असून अजूनही निर्णय झाला नाही.

  • अजित पवारांनी कोकाटेंना इशारा दिला असला तरी राजीनाम्याचा निर्णय फडणवीस यांच्या हातात आहे.

  • अजित पवार वाढदिवसाच्या निमित्ताने आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करत असून कोकाटेंचा सेंड ऑफ होणार का यावर चर्चा आहे.

सुप्रीम सरकार, साम टीव्ही प्रतिनिधी

Will Manikrao Kokate resign after playing rummy in assembly? : सभागृहात रमी खेळणाऱ्या आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषीमंत्री कोकाटे राजीनामा देणार की महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोकाटेंना अभय मिळणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र अधिवेशन संपून आठवडा उलटला तरी अजित पवारांनी कोकाटेंना जाब विचारलेला नसल्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता आता धूसर झालीय. मात्र अजित पवारांनी कोकाटेंच्या चुकांबाबत इशारा दिल्याचं स्पष्ट केलंय.. तर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलवलाय...

दरम्यान अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंत्री आणि आमदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय... तिथेच कोकाटेंचा सेंड ऑफ केला जाणार का? असा टोला रोहित पवारांनी लगावलाय... तर दुसरीकडे ठाकरे गटाने थेट राज्यपालांची भेट घेत 5 वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय..

माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री

संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री

योगेश कदम, गृहराज्यमंत्री

संजय राठोड, मृदा व जलसंधारण मंत्री

नितेश राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री

मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्र्यांच्या राजीनाम्याने फटका बसण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचही वादग्रस्त मंत्र्यांना अभय देण्याचे संकेत दिलेत....महायुती सरकारच्या स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यात पहिली विकेट पडली. त्यानंतर आता पाच मंत्री विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत.. त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या आतच मंत्रिमंडळाला गळती लागल्यास त्याचा जनतेत नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे....मात्र तरीही अजित पवार स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी कृषीमंत्री कोकाटेंना नारळ देणार की अभय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT