chhatrapati shahu maharaj kolhapur, mahavikas aaghadi, loksabha election 2024, kolhapur political news, sharad pawar kolhapur sabha saam tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपती? काेल्हापूरसाठी शरद पवारांची रणनिती

शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत अशी भावना शाहू महाराज यांनी यापुर्वी व्यक्त केली हाेती.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटी नंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कंबर कसलेली आहे. त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केलेला आहे. या दौऱ्यांमध्ये कोल्हापुरातील सभेचं अध्यक्षस्थान थेट शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना संधी मिळणार का ? अशी चर्चा काेल्हापूरात (kolhapur lok sabha election) रंगली आहे. (Maharashtra News)

संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीचे (loksabha election 2024) वेध लागलेले असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली. राष्ट्रवादीला पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा झंजावात दौरा सुरू केलेला आहे.

येत्या शुक्रवारी (ता. 25) कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा होत असताना या सभेचं अध्यक्षस्थान थेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्वीकारले आहे. यातून त्यांनी आगामी राजकीय दिशाच स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे. या पूर्वीच अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते कोल्हापुरातून त्यांच्या उमेदवारी साठी प्रयत्न करत असताना महाराजांच्या भूमिकेने आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पवार आणि छत्रपती घराण्याचे चांगले संबंध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषविणार आहेत. पवार आणि छत्रपती घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीच्या राजकीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला बळ दिल्याचं बोललं जात आहे.

या नावांची हाेतेय चर्चा

महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी खालील उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे

काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील (mla p.n.patil)

काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (mla satej patil)

बाजीराव खाडे (bajirao khade)

राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील (mla k.p.patil)

शिवसेनेचे संजय घाटगे (shivsena leader sanjay ghatge)

राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील (ncp leader v.b.patil)

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (shivsena leader sanjay pawar)

दरम्यान यातील काहीजण इच्छुक नसल्याचेही समजते.

शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या गटातील इच्छुक उमेदवारांची नावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सध्या खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (mla hasan mushrif) यांची नावे चर्चेत आहेत.

...तर भाजपला धावपळ करावी लागणार

या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यास महाविकास आघाडीची उमेदवारी प्रबळ होणार आहे. महाराजांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्यास आघाडीला अतिशय प्रबळ उमेदवार मिळणार आहे. त्याचाही मोठा फायदा आघाडीला होणार आहे.

यामुळे ते उमेदवार असावेत म्हणून पवारांनीच फिल्डींग लावली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याचे समजते. यामुळे महाराज राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला येणार आहेत असे झाल्यास भाजपला मात्र तगडा उमेदवार मिळविण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार हे मात्र निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT