नागपूर : नागपूरच्या (Nagpur) बर्डी या गजबजलेल्या भागातील 208 वर्ष जुनं असणाऱ्या पिंपळाचं झाड बांधकामासाठी तोडलं जाणार आहे. हे झाड अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे. मात्र, बांधकामासाठी या झाडाचा बळी दिला जाणार आहे, हे झाड इतिहास जमा होणार आहे.
हे देखील पहा -
मात्र, याला पर्यावरणवादी (Environmentalist) आणि स्थानिकांनी झाड तोडण्याला विरोध केला आहे. बर्डी परिसरात बुटी यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन आता घनश्याम पुरोहित यांना विकलीय. पुरोहित यांना या जागेवर निवासी संकुल उभारायचंय. मात्र, या जागेच्या मधोमध 208 वर्ष जुनं पिंपळाचं झाड आहे. बांधकामासाठी हे झाड तोडलं जाणार आहे. यासाठी पुरोहित यांनी नागपूर महापालिकेकडे (Nagpur Municipal Corporation) अर्ज केलाय. महापालिकेनं एक सुचना जाहिरात प्रकाशित करून आक्षेप मागितले आहेत.
मात्र, ही जाहिरात प्रसिद्ध होताच पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. 'हे झाड हेरिटेज मध्ये येते त्यामुळं तोडता येत नाही', असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे, तर 'या झाडांमुळे सावली आणि ऑक्सिजन (Oxygen) मिळतो' असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एकूणच या ऐतिहासिक झाड वाचाव अशी सर्वांची इच्छा आहे. एकीकडे वाढतं प्रदुषण (Pollution) तर दुसरीकडे अवेळी पडणारा पाऊस, महापुराचे थैमान. कोरोनासारख्या महामारीच्या येणाऱ्या भयंकर लाटा.. अशा स्थितीत तरी आपण विकासाच्या नावाखाली मोठ्या झाडांचा बळी देऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.