25 Villages In Yavatmal District Join Telangana Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal News: महाराष्ट्रातील 25 गावं तेलंगणात जाणार? विविध योजनांची शेतकऱ्यांना भुरळ

महाराष्ट्रातील 25 गावं तेलंगणात जाणार? विविध योजनांची शेतकऱ्यांना भुरळ

साम टिव्ही ब्युरो

25 Villages In Yavatmal District Join Telangana: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जिल्ह्यातील तेलंगणा सीमेजवळ असलेली २५ गावं ही तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत. दिग्रस येथे पूल झाल्याने आणि तेलंगणातील परिवहन सेवा मिळत असल्याने तिथल्या नागरिकांना आदिलाबादची बाजारपेठ जवळ पडतेय.

तसेच तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी २४ तास निशुल्क वीजपुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना प्रतिएकर १० हजार रुपयंपर्यंत कर्ज दिलं जातंय. त्यामुळे पैनगंगेच्या पट्ट्यातील २५ गावे तेलगंणाच्या प्रेमात आहेत.

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्याची सीमा पैनगंगा नदीवर संपते नदीच्या पलीकडून तेलंगणाची हद्द सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्याच्या सीमेजवळील पिंपळखुटी या गावाच्या पाचशे मिटर वर तेलंगाणातील डोलारा हे गाव आहेत. तेलंगाणातील डोलारा गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केसीआर सरकार चोवीस तास वीज देते. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कधी दिवसा तर कधी रात्रीपाळीत वीज दिल्या जाते.  (Latest Marathi News)

विशेष म्हणजे नैसर्गिक अपत्तीमुळे किंवा आत्महत्या झाल्यास तेलंगाना सरकार शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत नुकसान भरपाई देते तर त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार एक लाख रुपये देतात. मात्र ते मिळविण्यासाठी खटाटोप करावं लागते.

दिग्रस इथे पुल झाल्याने तसेच तेलंगणाची परिवहन सेवा मिळत असल्याने येथील नागरिकांना आदिलाबादची बाजारपेठ जवळची वाटते अनेकांची शेती या सीमावर्ती भागामध्ये आहे. तेथे मराठीसह तेलगू भाषा बोलली जाते.

पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे गाव आहे. पैनगंगा नदीने तेलंगणा आणि महाराष्ट्राला विभागले आहे. निम्म पैनगंगा धरण महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे २६ वर्षापासून रगडले आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने पैनगंगा नदीवर साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून चनाखा गावाजवळ विराट बॅरेजचं काम सुरू केलाय. त्यामुळे सीमावर्ती भागातील शेतकरी तेलंगणात जाण्याची ईच्छा व्यक्त करित आहेत.

तेलंगाणातील शेतकरी मालामाल अन् महाराष्ट्रातील शेतकरी कंगाल?

तेलंगणा सरकारने कमीवेळात प्रगती करित तेथील शेतकऱ्यांना सर्व सोईसुविधा देण्यास प्राधान्य दिलं. त्यानंतर तेलंगाणातील आदिलाबाद जिल्ह्यातील ५५ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ आणि तेलंगाणा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीवर साडे तीनशे कोटी रूपये खर्च करून विराट बॅरेजचं काम सुरू केलं. विशेष म्हणजे हे काम महाराष्ट्राच्या हद्दीत देखील सुरू आहे. मात्र त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही होणार नाही.

तेलंगणातील या योजनांचे आकर्षण

शेतकऱ्यांसाठी २४ तास निशुल्क वीज पुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ, रयतूब बंधू योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिल्या जातोय. प्रत्येक गावातील रस्ते विकसित करण्यात आले आहेत.मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये दिले जातात. घरकुल योजना प्रत्येकांसाठी राबवली जात आहेत. त्यामुळेच पैनगंगा पट्ट्यातील २५ गावातील शेतकरी तेलंगणा सरकारच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT