India Q4 GDP Data: केंद्र सरकारने 2023 च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीचे (GDP) आकडे जाहीर केले आहेत. चौथ्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकास दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारने जारी केल्या आकडेवारीनुसार, वर्ष 2023 मध्ये आर्थिक विकास दर 7.2 टक्के राहिला असून यात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. मागील वर्षी हाच विकास दर 9.1 टक्के इतका होता. यातच गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारताची जीडीपी 6.1 टक्के दराने वाढली होती.
यापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत जिडीपीची वाढ 4.4 टक्के होती. तर जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत जीडीपीचा दर 6.3 टक्के होता. वर्षभरापूर्वी म्हणजेच जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ 4.1 टक्के नोंदवली गेली होती. (Latest Marathi News)
उद्योगांची वाढ मंदावली
दरम्यान एप्रिल 2023 मध्ये आठ मूलभूत उद्योगांच्या म्हणजेच मुख्य क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी होऊन 3.5 टक्क्यांवर आला आहे. हा सहा महिन्यांचा नीचांक आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि विजेचे उत्पादन कमी झाल्यामुळे मुख्य उद्योगांची वाढ मंदावली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 9.5 टक्के वाढ झाली होती.
मार्च 2023 मध्ये उद्योगांचा विकास दर 3.6 टक्के होता. ऑक्टोबर 2022 पासून मोठ्या उद्योगांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. मागील वर्षी उद्योगांचे उत्पादन 0.7 टक्क्यांनी वाढले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.