wife  saamtv
महाराष्ट्र

बाब्बो, लातुरात पतीची संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा!

पत्नी मागील काही दिवसांपासून आपल्या पतीपासून विभक्त झालेली होती.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : पैशासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. संपत्ती लाटण्यासाठी पत्नीने पतीचे थेट मृत्यूपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार उदगीर (Udgir) शहरात घडला आहे. पत्नी मागील काही दिवसांपासून आपल्या पतीपासून विभक्त झालेली होती. या प्रकरणात पत्नी आणि नगरसेवकासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. उदगीर शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे देखील पहा :

उदगीर नगर पालिकेच्या हद्दीत परमेश्वर केंद्रे राहतात. मात्र मागील काही दिवसांपासून पत्नी (Wife) राजश्री केंद्रे यांच्यापासून विभक्त राहतात. याच विभक्त असलेल्या पत्नीने आपल्या पतीची (Husband) संपत्ती (Property) हडपण्यासाठी मोठा कट रचला. या महिलेले आपला पती जिवंत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवत उदगीर नगर पालिकेमधून पतीच्या नावाचे मृत्यूपत्र काढले.

वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी या महिलेने पतीचा म्हणजेच परमेश्वर केंद्रे यांचा मृत्यू (Death) झाल्याचा बनाव केला. मात्र, हा प्रकार समोर आल्यामुळे या महिलेचे बिंग फुटले. तसेच या प्रकरणात पत्नी राजश्री केंद्रे यांच्याविरोधात पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजश्री यांच्यासोबतच नगरसेवकासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० लाख ओबीसी बांधव मुंबईत धडकणार; आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापणार|VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हिरो दिसणाऱ्या टीसीला पाहून पोरीचा जीव झाला येडापिसा, VIDEO

Aadhaar Card: सुप्रीम कोर्टाचा नागरिकांना 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT