Nashik Police Saam Tv
महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने पत्नीने दिले डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन, 32 दिवसानंतर घडली धक्कादायक घटना

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : येथील मशरू भागात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका महिलनेनं तिच्या पतीला भुलीचं इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीवर जवळपास 32 दिवस रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारात प्रकृतीनं साथ न दिल्यानं डॉक्टरचा मृत्यू झाला. सतीश देशमुख असं मृत पावलेल्या डॉक्टरचं नाव आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने डॉ.देशमुख यांना भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Wife kills husband giving anesthetize injection)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे इतर व्यक्तीशी संबंध असल्याचं डॉक्टर देशमुख यांना कळलं होतं. त्यानंतर देशमुखांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यात वाद निर्माण झाला. १० सप्टेंबर रोजी देशमुखांची पत्नी आणि प्रियकर सतिष १० सप्टेंबर रोजी क्लिनिकमध्ये आले होते.त्यावेळी दोघांनी देशमुखांसोबत वाद सुरु केला.

त्यानंतर त्यांच्या पत्नीने भुलीचे इंजेक्शन देऊन देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार देशमुखांनी त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसांना तक्रार दाखल केली.तेव्हापासून देशमुखांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT