Sushama Andhare : पोलिसांनी सांगितलं तुमच्या जीवाला धोका, बाहेर पडू नका; यावर सुषमा अंधारेंच्या निर्णयाने भर सभेत टाळ्यांचा कडकडाट

चानक माझ्या सोसायटीमध्ये पोलीस येत आहेत. काल दिवभर आम्ही तणावात होतो, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
Sushma andhare news
Sushma andhare news saam tv
Published On

>> सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) फायर ब्रँड नेत्या म्हणून समोर येत असलेल्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) येथे एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत सांगितलं

Sushma andhare news
भाजपच्या पाठिंब्याने उपसभापती झाला जल्लोषही केला अन् अचानक गेला ठाकरेंच्या शिवसेनेत

मला कालपासून धमक्या येत आहे. काही इनपुट्स समोर आले आहेत. ज्यामध्ये सांगितलं जातंय की बाहेर पडून नका. कुणी हल्ला करेल, धक्काबुक्की करेल. पोलिसांचे मला फोन येत होते. तुम्ही सुरक्षित आहात का अशी विचारणा पोलिसांकडून केली गेली. काल तर माझ्या सोसायटीत पोलीस आले आणि त्यांनी काळजी घेण्यास सांगितलं. अचानक माझ्या सोसायटीमध्ये पोलीस येत आहेत. काल दिवभर आम्ही तणावात होतो, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. (Latest News Update)

आता मी बोलू नये म्हणून माझ्यावर केसेस केल्या जाऊ शकता किंवा माझ्यावर हल्ला केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त मी महिला कार्यकर्ता आहेत म्हणून माझ्यावर कमरेखाली वार केले जाऊ शकतात. या पलिकडे मला अडवण्यासाठी काही केलं जाऊ शकत नाही. असा परिस्थितीत माझ्याकडे दोन पर्याय उरतात. त्यांच्या मोडस ऑपरेंडीनुसार ते सेट करु शकतात किंवा शूट करु शकतात. तुम्ही शूट व्हाव की सेट व्हाव हे तुम्हाला ठरवायचं आहेत.

Sushma andhare news
देशाच्या आर्थिक अडचणीला नुपूर शर्मांचे वक्तव्य कारणीभूत; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

मला एकच चिंता आहे. मला पाच वर्षांची मुलगी आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता मी तिला आजपासून शिवसेनेला दत्तक दिलं आहे. मला काय झालं तर शिवसेना पक्षप्रमुख तिचे कुटुंबप्रमुख होतील आणि इथे जमलेले सर्व उपस्थित शिवसैनिक तिचा मामा म्हणून सांभाळ करतील. मात्र आम्ही घरात बसू हे शक्य होणार आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com