भाजपच्या पाठिंब्याने उपसभापती झाला जल्लोषही केला अन् अचानक गेला ठाकरेंच्या शिवसेनेत

उपसभापतीपदी भाजपच्या पाठिंब्याने विराजमान झालेल्या शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराने अचानक पलटी मारल्याने भाजपची एकच कोंडी झाली आहे.
BJP Vs Shinvde Uddhav Balasaheb Thackeray
BJP Vs Shinvde Uddhav Balasaheb ThackeraySaam TV
Published On

धुळे: धुळे (Dhule) पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक पार पडल्यानंतर उपसभापतीपदी भाजपच्या पाठिंब्याने विराजमान झालेला उमेदवार अचानक पलटी मारत शिवसेनेत (Shivsena) गेल्याने भाजपची एकच कोंडी झाली आहे. गनिमीकावा करत भाजपला चकवा देत विजयी झालेल्या उमेदवाराचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत करत आनंद साजरा केला आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ न शकल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने भाजपचा (BJP) पाठिंबा घेत भाजपयुतीच्या बळावर उपसभापती पद मिळविले. मात्र, उपसभापतीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपसोबत नवनिर्वाचित उपसभापती देवेंद्र माळी या उमेदवाराने जल्लोष देखील साजरा केला.

पाहा व्हिडीओ -

भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर संध्याकाळी अचानक भाजपच्या या विजयाला विरजण लागल्याचे बघावयास मिळाले. कारण भाजपसोबत गेलेल्या उपसभापतीपदी विराजमान झालेल्या शिवसेनेच्या देवेंद्र माळी या उमेदवाराने अचानकपणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला समर्थन जाहीर करत भाजपला मोठा धक्का दिला.

दुपारी भाजपसोबत जल्लोष साजरा करणाऱ्या या उमेदवाराने संध्याकाळी अचानकपणे उद्धव ठाकरे शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांसोबत वेगळा जल्लोष साजरा केला आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीदरम्यान झालेल्या ऊलतापालथमुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

BJP Vs Shinvde Uddhav Balasaheb Thackeray
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, मशालीपेक्षा खंजीर सहजपणे...

यापुढे देखील आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार असल्याचे उपसभापतीपदी वर्णी लागलेले नवनिर्वाचित उमेदवारांने जाहीर केल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेच्या या उमेदवाराच्या उलथापालथीमुळे उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी वरती देखील याचा परिणाम होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com