मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्युत विभागात पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय. कन्हैया तानाजी काळे (18) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) येथे राहणाऱ्या कन्हैयाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.कन्हैयाला गणित विषय समजत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Student ends life because of math's subject tension)
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैयाने गुरुवारी वसतिगृहामध्ये असलेल्या खोलीमध्ये पंख्याला दोरी लावून आत्महत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिष होळकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत प्राथमिक चौकशी केली आहे.
17 आणि 18 ऑक्टोबरला इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयाची युनिट टेस्ट होती. कन्हैयाला गणित विषय समजत नसल्याने तो नैराश्यात होता. गुरुवारी सकाळी कन्हैयाने पोटात दुखत असल्याचं कारण सांगितल्याने तो कॉलेजला न जाता रुममध्येच थांबला. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी माहिती होळकर यांनी दिलीय.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.