Sourav Ganguly BCCI President : सौरव गांगुलीने मौन सोडलं; प्रत्येक जण नेहमी एकाच पदावर राहत नाही...

रॉजर बिन्नी यांना गांगुलीऐवजी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. रॉजर बिन्नी यांनी उमेदवारीही दाखल केली आहे.
sourav ganguly
sourav gangulySaam TV
Published On

मुंबई : बीसीसीआयचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Saurav Ganguly) जाणे जवळपास निश्चित झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुलीला आणखी एक टर्म मिळणार नाही. 1983 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले रॉजर बिन्नी यांना गांगुलीऐवजी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. रॉजर बिन्नी यांनी उमेदवारीही दाखल केली आहे आणि त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

sourav ganguly
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची पुन्हा दादागिरी; कृषी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

सौरव गांगुलीने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. गांगुलीने म्हटलं की, प्रत्येकजण कायम एका पदावर राहू शकत नाही. प्रशासक असण्यापेक्षा क्रिकेट खेळणे कठीण आहे, असे गांगुलीचे मत आहे. एका दिवसात कोणीही नरेंद्र मोदी किंवा सचिन तेंडुलकर बनत नाही, असे गांगुलीने म्हटलंय. (Latest Marathi News)

एक क्रिकेटपटू म्हणून आव्हान खूप जास्त होते, तर प्रशासक म्हणून तुमच्याकडे गोष्टी दुरुस्त करण्यासाठी वेळ आहे. पण जर तुम्हाला कसोटीच्या पहिल्या सकाळी ग्लेन मॅकग्राच्या बॉलिंगवर विकेट गेली तर तुम्हाला ती दुरुस्त करायला वेळ मिळत नाही. कोणीही कायमचे अॅडमिन किंवा स्पोर्ट्स मॅन असू शकत नाही. प्रशासक किंवा खेळाडू प्रत्येकजण कायम एकाच भूमिकेत असू शकत नाही, असं गांगुली यांनी म्हटलं.

sourav ganguly
देशाच्या आर्थिक अडचणीला नुपूर शर्मांचे वक्तव्य कारणीभूत; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

गांगुली यांनी पुढे म्हटलं की, प्रत्येकाला दीर्घकाळ जगण्यासाठी काही पावले उचलावी लागतात. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर बनू नका. तुम्ही एका दिवसात नरेंद्र मोदी बनत नाही. इतके यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय केले? आपण सर्वजण शेवट पाहतो.

मी BCCI चा अध्यक्ष होतो, पण एक खेळाडू म्हणून आयुष्य खुप चांगलं होतं. ती 15 वर्षे खूप आठवणीत राहणारी होती. आपल्याला खूप पैशांची गरज नाही, आनंदी राहण्यासाठी फक्त एक छोटी रक्कम पुरेशी आहे. मी भूतकाळावर विश्वास ठेवत नाही, मी प्रत्येक वेळी पुढे पाहतो. मी भारतासाठी खूप सामने खेळले आहेत आणि 100 कसोटी सामने खेळले हे काय कमी आहे. लॉर्ड्सवर पदार्पण करणे माझ्यासाठी आनंददायी होते. मी अशा संघाचे नेतृत्व केले जेथे प्रत्येकजण कर्णधार बनू शकत होता. सचिनप्रमाणेच राहुल आणि व्हीव्हीएस सोबत असताना मी कर्णधार असणे मोठी गोष्ट आहे, असंही गांगुलीने म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com