Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काटा काढला, दारू पाजली अन् मग...

Shocking Crime Case: प्रेमात अडसर ठरणार्‍या पतीचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना दापोलीत घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

प्रेमात अडसर ठरणार्‍या पतीचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना दापोलीत घडलीय. पत्नीचे प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. पण पतीची अडचण होत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढलाय. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, संशयित आरोपीला पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतलं आहे.

दापोलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची अधिक तपास पोलीस करीत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. मात्र, ते सोमवारीपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी निलेश बाक्कर यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता, तिच्या जबाबात तफावत आढळून आली.

नेहा बाक्कर यांच्या जबाबात तफावत आढळल्याने, पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये कार्यरत होती, त्या ठिकाणाची तपासणीला सुरूवात केली. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, नेहा आणि तीचा प्रियकर हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

सीसीटीव्ही कॅमऱ्यात नेहा बिअर घेत असाताना देखील दिसत होती. प्रियकराच्या मदतीने तिने आधी नवऱ्याला दारू पाजले, नंतर दोघांनी मिळून पती निलेशची हत्या केली. त्यानंतर दोघांनी निलेशचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

या प्रकरणी संशयित आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर फरार होता. मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता, त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतलं. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT