महाराष्ट्र

Rahul Gandhi : पंतप्रधान माफी का मागताहेत? शिवरायाच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi Slams PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.

Bharat Jadhav

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. आज सांगलीत राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी का माफी मागत आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय.

राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. ८ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. छत्रपती शिवरायाचा पुतळा पडल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर वाढवण पोर्टचं उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली.त्यावरून राहुल गांधी सवाल केला.पंतप्रधान मोदी याप्रकरणात का माफी मागत आहेत, त्या मागील कारणं सांगितली.

पीएम माफी मागत आहेत त्यामागील पहिलं कारण म्हणजे मूर्ती बनवण्याचं कंत्राट हे आरएसएस विचारधार असलेल्या व्यक्तीला देण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी हे कंत्राट दुसऱ्याला द्यायचं होतं, माझी चुकी झाली. माफीचं दुसरं कारण हे कदाचीत भ्रष्टाचार असावा. मूर्ती बनण्यात भ्रष्टाचार झाला असावा, महाराष्ट्राच्या लोकांचा पैसा चोरला किंवा पंतप्रधान मोदी म्हणत असतील की,त्यांनी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार दिला म्हणून त्यांनी माफी मागितली, असावी असं राहुल गांधी म्हणालेत.

भ्रष्टाचार झाल्याने शिवाजी महाराज यांचा अपमान झाला. पंतप्रधान मोदींना माफी मागायची असेल महाराज यांची नाही तर महाराष्ट्रामधील सगळ्या व्यक्तीची मागायला हवी. या देशात सगळे कंत्राट अदानी, अंबानी यांना दिली जात आहेत. अडाणी आणि अंबानी यांची मी नवीन नवे A1 आणि A2 अशी ठेवली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

SCROLL FOR NEXT