महाराष्ट्र

Anil Deshmukh: अजित पवारांना आतापासूनच का साईडलाईन करतायेत?; अनिल देशमुखांचा सवाल

Bharat Jadhav

Anil Deshmukh On Ajit Pawar Group:

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवार यांना साईडलाईन केलं जाईल, हे सर्वांना माहितेय. पण ते आतापासूनच अजित दादांना का साईडलाईन करतायेत, याचा पेच आम्हालाही पडला आहे, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. अकोला येथे माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली.(Latest News)

राज्य सरकार आणि भाजपवर टीका करताना अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते सत्तेत का सामील झाले याचेही सत्य सांगितलं. आमचे सहकारी गेले हे प्रेमापोटी नाही गेले. ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये, म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला. जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिष्किल टीकाही अनिल देशमुखांनी केली.जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो. आपल्यालाही मंत्री पद मिळालं असतं असाही दावा देशमुखांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यावर जनता नाराज

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहेत. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे, अशी टीकाही अनिल देशमुखांनी केली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही त्यांनी केली.

फडणवीसांच्या आदेशाने लाठीचार्ज

जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात अनिल देशमुखांनी केला आहे. तर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलन दरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. असा अमानुष लाठी हल्ला गृहामंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही, असा आरोपही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला.

कपासाला १४ हजाराचा भाव द्या

दहा वर्षाआधी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सोयाबीनला ६ हजार भाव द्या अशी मागणी केली होती. तर आज कापसाला १४ हजार भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला ८ हजार भाव दिला पाहिजे, अशी मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT