Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

State BJP President of Maharashtra: भाजप प्रदेशाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी? तीन नावं चर्चेत..मुनगंटीवार..

Who Will be the next State BJP President of Maharashtra: चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली. पण आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष नक्की कोण होणार? याची चर्चा सुरू आहे. अशातच रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे या दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे.

Bhagyashree Kamble

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली. पण आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष नक्की कोण होणार? याची चर्चा सुरू आहे. अशातच रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे या दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. या दोघांनाही मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे ही दोन नावे आघाडीवर आहेत. तर रवींद्र चव्हाण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

रवींद्र चव्हाण हे शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक मंत्री होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. कोकणात मोठा विजय मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते म्हणूनही त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचं ठरलं तर, चव्हाण यांच्या नावाला पंसती दिली जाईल, अशी चर्चा आहे.

जळगावचे आमदार डॉ संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. ते कुणबी समाजाचे (बहुजन) मानले जातात. बावनकुळे हे तेली समाजाचे (बहुजन) आहेत. जर बहुजन समाजालाच संधी द्यायचं ठरलं, तर नक्कीच कुटे यांचे नाव प्रामुख्यानं घेतलं जाईल.

जातीय समि‍करण साधताना प्रवीण दरेकर यांच्याही नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा उद्भवला असताना, प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर हे देखील प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे हे धनगर समाजाचे आहेत. विधानपरिषदेचे सभापतीपद मिळाले नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तेही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. तर, मंत्रि‍पदाची संधी न मिळू शकलेले सुधीर मुनगंटीवार यांचे पुर्नवसन कसे होते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एक व्यक्ती एक पद हा फॉर्म्युला ठरला तर..

भाजपमध्ये एक मंत्री एक पद असा नियम आहे. जे.पी.नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातही वापरला गेला तर, बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT