eknath shinde yandex
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

Descendants Of Saints Letter To Prime Minister Narendra Modi: महाराष्ट्रातील संतांच्या वंशांची पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

Ankush Dhavre

Maharashtra Chief Minister: विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. एकतर्फी विजयानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन स्पर्धा रंगली आहे.

काहींना वाटतंय की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, तर महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील संतांच्या वंशांच्या मते, एकनाश शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले, ' हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आंनदजी दिघे साहेब यांच्या विचारांना प्रवाहित करत आपण महाराष्ट्रात उत्तम असे हिंदुत्वाचे कार्य केले. आपल्या विशेष सहकार्याने या कार्यात मुख्यमंत्री श्रीएकनाथजी शिंदे यांचे मोठे योगदान राहिले. त्यांना उपलब्ध असणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीत मागील दहा वर्षापेक्षा अधिकच कार्य त्यांनी केले आहे. आपल्या पावलांवर पाऊल ठेवत लोक कल्याणकारी योजनांसहित हिंदुत्व साधुसंत तीर्थक्षेत्र व सकल समाजाच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. '

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही शर्यतीत आहेत. महाविकास आघाडीत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली होती. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते.

आता मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असताना, अजित पवार देखील मुख्यमंत्री पदासाठी ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश

राज्यात २८८ मतदार संघांसाठी मतदान पार पडलं. यापैकी २३० जांगावर महायुतीने बाजी मारली. भाजपने वनसाईड १३२ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४१ जागांवर ताबा मिळवला.

तर महाविकास आघाडीला ४६ जागा जिंकता आल्या. दरम्यान काँग्रेसला १६, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २० आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा जिंकता आल्या. तर समाजवादी पक्षाने २ आणि १० जागांवर अपक्षांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT