Eknath Shinde reacts to Shiv Sena ownership dispute during Supreme Court hearing saam tv
महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंनी तीन शब्दांत विषय संपवला

Who Owns Shiv Sena Latest Supreme Court Hearing Update: शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. जनतेनेच कौलातून उत्तर दिल्याचे त्यांनी सांगत विरोधकांवर टीका केली.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा: शिवसेना नेमकी कोणाची?" यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तसेच आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र कोर्टाने अद्याप तरी निकाल दिलेला नाहीये. यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेना कोणाची, याचं स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनेच आपल्या कौलातून दिले आहे," असे वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावात होते. यावेळी ते म्हणाले, पूर्वी आमच्याकडे ४० आमदार होते, आज जनतेने ६० आमदारांना निवडून दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेवरचा विश्वास सिद्ध झाला आहे.

सरकार आणि मुख्यमंत्री 'घटनाबाह्य' असल्याचा आरोप करणे ही विरोधकांची आता जुनी 'रिपीट कॅसेट' झाली आहे. जेव्हा एखादा निर्णय यांच्या बाजूने लागतो, तेव्हा हे न्यायालयाचे कौतुक करतात आणि निर्णय विरोधात गेला की न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावर आरोप करतात. लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असते. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम को्रटात महत्वाची सुनावणी पार पडली. कोणत्याही राजकीय पक्षाचे नियंत्रण हे त्याच्या विधिमंडळ पक्षावर असते आणि विधिमंडळ पक्षाच्या बहुमतापेक्षा राजकीय पक्षाचा निर्णयच अंतिम आणि सर्वोच्च मानला जावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडला. दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी कायद्याचा हवाला देत कपिल सिब्बल यांनी दावा केला की, मूळ पक्षाचा व्हीप झुगारून वेगळी भूमिका घेणारे आमदार आपोआप अपात्र ठरतात.

युक्तिवाद करताना सिब्बल म्हणाले की, १९९९ ची घटना ही मूळ घटना नव्हती आणि त्यातही सुधारणा करण्यात आल्या होत्या. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान निवडणूक आयोगासमोरील प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील समर्थनाबाबत प्रतिज्ञापत्रे दाखल केली होती. त्यावेळच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने १६० सदस्यांचे समर्थन होते. तर दुसऱ्या बाजूला शून्य समर्थन होते. अशा परिस्थितीत २०१८ ची पक्षघटना बाजूला ठेवणे त्यांच्यासाठी सोयीचे होते, असा आरोप सिब्बल यांनी केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

मुंबई-पुण्यातील वाहन नंबर सिरीज संपली; तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळणार; कुठे आणि कसा कराल अर्ज?

लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹25,000 बेसिक पगार असलेल्यांनाही मिळू शकतो पेन्शनचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर ते गुंतवणूक....काय काय बदलणार?

CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?

SCROLL FOR NEXT