CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?

CJP Forms National Leadership Team: कॉक्रोच जनता पार्टीकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारणीवर ११ सदस्य असणार आहेत.
CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?
Abhijeet DipkeSaam Tv
Published On
  • अभिजीत दिपकेंकडून राष्ट्रीय कार्यकारिणी घोषणा

  • कॉक्रोच जनता पार्टी राष्ट्रीय पदाधिकारी यादी समोर

  • सीजेपीकडून राष्ट्रीय विस्तार आराखडा तयार

  • राष्ट्रीय कार्यकारिणी समितीमध्ये १४ सदस्यांची नावं

कॉक्रोच जनता पार्टीने आज आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची घोषणा केली. या समितीचे नाव 'संघटनात्मक रचना आणि राष्ट्रीय विस्तार आराखडा' असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये १४ पदांचा समावेश आहे. या १४ पदांसाठी एकूण ११ जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वांची नावं देखील समोर आली आहेत. अभिजीत दिपके यांनी कुणाकडे काय जबाबदारी सोपवली आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये अभिजीत दीपक यांची संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची सह-संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजिंक्य शिंदे यांची राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक बलियान यांची राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अफरीन नवाज यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आक्रमक; अभिजीत दिपके अन् CJP ला दिला मोठा झटका

विजय रेड्डी मलंगी यांची माध्यम संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रत्ना सिंग यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी देण्यात आली आहे. वैष्णवी गौर यांच्याकडे संशोधन आणि धोरण प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. रोहन देशपांडे यांची तंत्रज्ञान प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश इंगळे यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?
Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

याचसोबत कॉक्रोच जनता पार्टीने चार विभागीय प्रमुखांची नियुक्ती केली आहे. दीपक बलियान यांच्याकडे उत्तर विभागाची, तर विजय रेड्डी मलंगी यांच्याकडे दक्षिण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. अंकित भारद्वाज यांच्याकडे पूर्व आणि ईशान्य विभाग, तर योगेश इंगळे यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने राष्ट्रीय कार्यकारी समितीची घोषणा करत सर्वांवर जबाबदाऱ्या सोपवताना असे देखील सांगितले की, पुढील सहा महिन्यांत कॉक्रोच जनता पार्टी भारतभर राज्य समन्वय समित्या तसेच लोकसभा मतदारसंघ आणि शहरस्तरीय समन्वय यंत्रणा स्थापन करेल. आज ज्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यांच्याशिवाय इतर कोणालाही सीजेपीकडून पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही.

CJP: कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा; समितीवर ११ जणांची नेमणूक; कुणाकडे कोणती जबाबदारी?
Abhijeet Dipke : आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय; अभिजीत दिपकेंच्या कार्यशैलीवर संशय, घरासमोर CJP आंदोलकांचा गोंधळ

राष्ट्रीय पदाधिकारी -

संस्थापक व राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दिपके (३० वर्षे)

सह-समन्वयक: आशुतोष रांका (३० वर्षे), सौरव दास (२७ वर्षे)

राष्ट्रीय संघटन प्रभारी: अजिंक्य शिंदे (३५ वर्षे)

संघटन सह-प्रभारी: दीपक बालियान (२६ वर्षे)

राष्ट्रीय सचिव: आफरीन नवाज (३४ वर्षे)

मीडिया प्रमुख: विजय रेड्डी मल्लांगी (३० वर्षे)

कायदेविषयक प्रमुख: रत्ना सिंह (३१ वर्षे)

संशोधन व धोरण प्रमुख: वैष्णवी गौर (२९ वर्षे)

तंत्रज्ञान प्रमुख: रोहन देशपांडे (३१ वर्षे)

वित्त प्रमुख: योगेश इंगळे (३३ वर्षे)

विभागीय (झोनल) नेतृत्व -

उत्तर विभाग: दीपक बालियान (२६ वर्षे)

दक्षिण विभाग: विजय रेड्डी मल्लांगी (३० वर्षे)

पूर्व व ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज (३५ वर्षे)

पश्चिम विभाग: योगेश इंगळे (३३ वर्षे)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com