आम्ही ४० दिवस कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात होतो, मग फक्त नातेवाईक आणि मित्रांनाच घेऊन बैठका का घेतल्या जातात? अभिजीत आम्हाला विश्वासात घेत नाही, असा आरोप करत दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या गुजरातमधील दोन तरुणांनी दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरासमोर आंदोलन केले. आम्ही त्याच्याा घरासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्हाला देशात दुसरा अरविंद केजरीवाल नको असं म्हणत त्यांनी हल्लाबोलही केला.
अभिजीत दीपकेंसह जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या गुजरातच्या अहमदाबाद येथील मनीष ब्राह्मभट, राहुल पांड्या यांनी अभिजीत आणि त्यांच्या कार्यशैलीला विरोध दर्शवत घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. आम्हाला अभिजीत विश्वासात घेत नाही. अभिजीत त्याचे नातेवाईक आणि त्याच्या मित्रांनाच बैठकीला बोलावतो, असा आरोप दोघांनीही केला. हे आंदोलन सुरुवातीपासून फेसलेस होते, आम्ही देखील कॉक्रोच आहोत. मग मोजक्याच लोकांना बैठकीमध्ये का बोलावून घेतले जाते, असा सवालही त्यांनी केला.
हे आंदोलन सर्वसमावेशक असले पाहिजे. जोपर्यंत सर्वसमावेशक आंदोलनाची घोषणा होणार नाही; तोपर्यंत अभिजीत दिपकेंच्या घरासमोर अन्नपाणी त्याग करून आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनीष ब्राह्मभट आणि राहुल पांड्या यांनी म्हटले.
बैठकीला आम्हाला बोलावले पाहिजे. आमच्यासोबत जोडले जावेत, असे आम्हाला म्हणायला हवे होते. हे लोक राजकारणाशी जोडलेले नव्हते. पण आम्ही यांना महत्व देणार नाही. आठ-दहा लोकांना बोलावून सगळं ठरवू, असं जर यांना वाटत असेल तर आम्हाला या देशात दुसरा अरविंद केजरीवाल नकोय. आमची जनताच हायकमांड आहे. आमचा काही विरोध नाही. अंतर्गत लोकशाही असायला हवी. सामूहिक जबाबदारी असायला हवी, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.