Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

Abhijit Dipke: CJPच्या अभिजीत दिपकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. CJPच्या आंदोलकांनी एका इनफ्लुएंसरवर हल्ला केल्यानं दिपकेंना अटक करा, अशी मागणी करण्यात आलीय. मात्र दिपकेंवर आरोप कुणी केला? CJPनं सोशल मीडिया इनफ्लुएंसरवर खरंच हल्ला केलाय का? पाहूयात या रिपोर्टमधून....
Abhijit Dipke
Abhijit DipkeSaam Tv
Published On

Abhijit Dipke: दिल्लीतील जंतरमंतरवर गाजलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या दिपकेंच्या अटकेची मागणी आता पुढे आलीय.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असणाऱ्या फैजान अन्सारीनं CJPच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय. ज्यामुळे दिपकेंना अटक करा, अशी मागणी इन्फ्लुएंसरनं पोलिसांकडे केली. तर दुसरीकडे माझ्या विरोधात भरपूर तक्रार होतील, असं म्हणत दिपकेंनी आरोप फेटाळून लावलेत.

Abhijit Dipke
Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

दरम्यान फैजान अन्सारीनं दिपकेंच्या अटकेच्या मागणीसह जंतरमंतरवरील आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवर बोलताना दिल्ली पोलिसाचं तोंडभरून कौतुक केलयं...तसचं दिपके स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी राजकारण करत असल्याची टीकाही अन्सारीनं केलीय.

Abhijit Dipke
Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

विशेष म्हणजे CJPच्या लोकांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ पुरावे असल्याचा दावाही अन्सारीनं केलाय... मात्र माध्यमांना हा पुरावा अन्सारीनं दिलेला नाही... त्यामुळे इन्फ्लुएंसर असणारा फैजान अन्सारी फक्त प्रसिद्धिसाठीच दिपकेंवर आरोप करतोय का? खरचं अन्सारीच्या आरोपात तथ्य असेल तर त्यानं पुरावे माध्यमांना का दाखवले नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com