NCP Leader Baba Siddique Firing:  Saamtv
महाराष्ट्र

Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

NCP Leader Baba Siddique Firing: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, राज्यमंत्री ते अजित पवार गटात प्रवेश अशी मोठी राजकीय कारकीर्द असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोण होते बाबा सिद्दीकी? जाणून घ्या सविस्तर.

Gangappa Pujari

NCP Leader Baba Siddique Death: एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याच्या सभांचा धडाका सुरु असतानाच भयंकर घटनेने मुंबई हादरुन गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनच्या सिग्नलजवळ बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचे कार्यालय आहे. याच परिसरात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, राज्यमंत्री ते अजित पवार गटात प्रवेश अशी मोठी राजकीय कारकीर्द असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोण होते बाबा सिद्दीकी? जाणून घ्या सविस्तर.

कोण होते बाबा सिद्दीकी?

बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे महाराष्ट्रातील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मुंबई काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा असलेल्या सिद्दीकी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री म्हणूनही काम केले होते. बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते आणि त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. याआधी त्यांनी सलग दोन वेळा (1992-1997) महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे.

राजकीय कारकीर्द

काँग्रेस सोडण्यापूर्वी ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीत होते. 1980 मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तब्बल ४८ वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम गेले ज्यानंतर वर्षभरापूर्वीच ते राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झाले होते.

बॉलिवूडमध्येही दबदबा...

बाबा सिद्दीकी हे नाव जितके राजकारणात लोकप्रिय होते तितकेच ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील आघाडीच्या खान मंडळींसह सर्व अभिनेते, अभिनेत्री हजेरी लावायचे. बाबा सिद्दीकी यांनी रमजानच्या काळात इफ्तार पार्ट्या सुरू केल्यावर राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. केवळ राजकीय व्यक्तीच नाही तर बॉलिवूडचे बडे स्टार्सही त्यांच्या पार्ट्यांना हजेरी लावू लागले. या इफ्तार पार्ट्यांमध्ये सलमान-शाहरुख खानपासून अनेक दिग्गज दिसायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT