Bhagat Singh Koshyari, PM Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं? PM मोदींना आहे का अधिकार?

राज्यापालांनी जर राजीनामा दिल्यास तो कोण घेणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय मोठी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यापालांनी जर राजीनामा दिल्यास तो कोण घेणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Maharashtra Political News)

राज्यपालांची नेमणूक कशी होते?

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. राष्ट्रपती पदासाठी पात्रता म्हणून ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करु शकतात. शिवाय राज्यपालाला पदावरुनही हटवू शकतात. (Latest Marathi News)

राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं?

राज्यपाल भवनाच्या पेजवर दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून १५५ कलमाखाली केली जाते. तर राष्ट्रपती हे ७४ कलमाप्रमाणे पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागतात. त्यामुळे राज्यपालांची नेमकणूक आणि त्यांना पदावरुन हटवणं हे दोन्ही पंतप्रधानांच्या हाती जातं. मात्र, राष्ट्रपतींच्या सहमतीशिवाय हे होत नाही.

राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात काय म्हटलं?

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे.

काल-परवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे. "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मनाप्रमाणे दिवस जाईल, 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mango Pickle Recipe : १०-१५ मिनिटांत चटपटीत लोणचे तयार; वर्षभर टिकेल चांगले, न विसरता टाका 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अन्न धान्याचे मोठे नुकसान

Dharmendra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारताना हेमा मालिनी यांना अश्रू अनावर

४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT