Rahul Gandhi : पहिल्या नोकरीचा पगार किती होता? केव्हा आणि कोणाशी लग्न करणार? राहुल गांधींनी सांगितली मनातली गोष्ट

यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर राहुल गांधी चर्चेत आले आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Saam Tv

Rahul Gandhi News : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृ्त्वाखाली 'भारत जोडो' यात्रेचा अंतिम टप्पा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत काढलेल्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान राहुल गांधी हे कोणत्या ना कोणत्या बाबीमुळे चर्चेत राहिले. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर राहुल गांधी चर्चेत आले आहे. (latest Marathi News)

Rahul Gandhi News
Shivsena-VBA Alliance: ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा, आगामी निवडणुका एकत्र लढणार

राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेच्या दौऱ्यादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील  Curlytales ला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नावरून प्रश्न विचारला. त्यावेळी राहुल गांधी यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, 'सध्या लग्नाचं प्लॅनिग करत आहे. लग्नासाठी चांगली मुलगी मिळाली तर लग्न करेन'. लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'मला बायको म्हणून प्रेमळ आणि हुशार मुलगी हवी आहे'.

राहुल गांधी यांनी या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावरील विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राजीव गांधी यांच्या उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, 'माझ्या घरचे लग्नाच्या विरोधात नाहीये. माझ्या आई-वडिलांचा विवाह खूप भारी झाला. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या बाबतीत माझे विचार खूप उच्च आहेत. मी देखील अशाच मुलीच्या शोधात आहे'.

राहुल गांधींना जेवणात कोणता पदार्थ आवडतो?

राहुल गांधी यांना जेवणात कोणता पदार्थ आवडतो,यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'मी सर्व पदार्थ खातो. पण मला जॅकफ्रुट आणि वाटाणे आवडत नाही'. त्याचवेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान आवडीचे पदार्थ खाण्याला सवड मिळत नाही. त्यामुळे जे मिळालं, ते खाऊन घेतो. तेलंगणात तर खूप जास्त तिखट खातात. त्यावेळी फार अवघड परिस्थिती झाली होती'.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुढे सांगितले, 'माझा जन्म काश्मिरी पंडित कुटुंबात जन्म झाला. त्यानंतर ते उत्तर प्रदेशात स्थायिक झाले. वडिलांचे वडिल हे पारसी होते. घरात भारतीय पद्धतीचं जेवण तयार केलं जातं. दुपारच्या जेवणासाठी देशी खाद्यपदार्थ आणि रात्री कॉन्टिनेंटल फूड तयार केले जाते'.

तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आइसक्रीम खाण्यास पसंत आहे. तसेच तंदुरी खाण्यास राहुल गांधी यांना आवडते. याचबरोबर चिकन टिक्का, मटण, कबाब, अंड्याची पोळी पसंत आहे.

Rahul Gandhi News
Eknath Shinde : शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शिक्षण आणि पहिली नोकरी कुठे केली ?

राहुल गांधी यांनी सांगितले, 'सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला. यानंतर हार्वर्ड विद्यापीठात 'आतंरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण' या विषयाचा अभ्यास केला. त्यानंतर वडिलांचे निधन झालं. त्यानंतर अमेरिकेत गेलो. रोलिंस कॉलेजमध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र' विषयाचा अभ्यास केला. कॅम्ब्रिज विद्यापीठात पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले.

पहिल्या नोकरीविषयी राहुल गांधी म्हणाले,'पहिली नोकरी लंडन येथे केली. कंपनीचं नाव 'मॉनिटर' होतं. ही स्ट्रॅटेजिक कंसल्टिंग कंपनी होती. त्यावेळी ३००० ते २,५०० पाऊंड पगार मिळाला. त्यावेळीच्या दृष्टीकोनातून चांगला पगार होता. मी त्यावेळी केवळ २५ वर्षांचा होतो'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com