Saam Tv
खूप खाल्ल्याने कॅलरीज जमा होतात. त्यामुळे वजन लगेच वाढते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करण हे सर्वात महत्त्वाचे असते.
५ किलो वजन कमी करण्यासाठी आहारात ५०० ते ७०० कॅलरीज कमी करावे लागतील. त्यासाठी जंक फूड, शीतपेये, गोड पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे.
दिवसाचा व्यायाम नक्की करा. त्यात चालणे, पुश-अप्स, स्व्कॅट्स यांचा समावेश करा. यामुळे बरेच वजन कमी होण्यास मदत होईल.
व्यायामासोबतच खाण्याच्या सवयीमध्ये देखील बदल करावा लागेल. खाण्यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
पाण्यामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते. व्यायामावर भर दिल्याने भरपूर डिहायड्रेशन होते. त्यामुळे पुरेसे पाणी प्या.
रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात चपाती आणि भाताचे प्रमाण कमी करा. बाजरी किंवा नाचणीची भाकरी खा. राईस खाण्याची खूपच इच्छा होत असेल तर ब्राऊन राईस खावू शकता.
संध्याकाळी भूक लागल्यास मखाणा, भाजलेले हरभरे, मूठभर बदाम सुकामेवा, मोड आलेली कडधान्यांचा समावेश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.