Heart Attack Symptoms : २० - ३० वयातच दिसू लागली आहेत, हार्ट अटॅकची ही लक्षणे, या संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Saam Tv

हॉर्ट अटॅकचा वाढता धोका

कॉर्पोरेट जीवनशैलीमुळे शरीराची हालचाल मंदावते. सतत स्क्रिन पाहणे, तासंतास बसून राहणे, पॅकेड्स फुड्स, झोपेचा पत्ता नसणे, स्ट्रेस , डिप्रेशन यामुळे तरूणांमध्ये हॉर्ट अटॅक धोका वाढत आहे.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

लक्षणे दुर्लक्षित करू नका

हॉर्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर संकेत देत असते परंतु आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. त्यामुळे ही लक्षणे वेळीच ओळखा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

छातीत जडपणा

छातीच्या मध्यभागी दाब, घट्टपणा, जडपणा किंवा दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. या वेदना काही मिनिटे राहू शकतात किंवा कमी होऊन परत जाणवू शकतात.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

हात, पाय खांदा जबडा दुखणे

छातीत दुखणे त्यासोबतच डावा किंवा दोन्ही हात, खांदे, पाठ, मान किंवा जबड्यापर्यंत वेदना जाणवणे हे हॉर्ट अटॅकच्या सुरूवातीचे संकेत आहेत.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

श्वास घेण्यास त्रास होणे

छाती जड होऊन अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, थोडेसे जरी चालले तरी धाप लागणे. हा मुख्य संकेत आहे.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

थंड घाम येणे

कोणतेही अवजड काम किंवा व्यायाम केला नसला तरी अचानक थंड घाम येणे. थकवा आल्यासारखा वाटणे. यामुळे हॉर्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

मळमळ आणि उलटी

छातीत जडपणा त्यासोबतच अस्वस्थता, उलटी सारखे वाटणे, मळमळ होणे , छातीत जळजळणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

Mental Health Tips : सतत उदास आणि निराश वाटतंय? या आजाराची आहेत ही गंभीर लक्षणे

Mental Health Tips | meta ai
येथे क्लिक करा