Saam Tv
आजूबाजूला आनंदी वातावरण असून देखील तुम्ही एकटेच राहत असाल, कोणाशी बोलत नसाल, उदास वाटत असेल तर ही लक्षणे डिप्रेशनची आहेत.
आधी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये, छंदामध्ये, मित्र परिवारात, कुटुंबासोबत वेळ घालवणे आवडत नसेल तर ही लक्षणे डिप्रेशनची आहेत.
रात्री मध्येच जाग येणे, उशीरापर्यंत झोप न लागणे किंवा नेहमीपेक्षा खूप जास्त झोप लागणे असे बदल डिप्रेशनमुळे होऊ शकतात.
भूक कमी होणे किंवा अचानक जास्त भूक लागणे. तसेच वजन कमी-जास्त होणे ही लक्षणे डिप्रेशनची आहेत.
डिप्रेशनमुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो. यामुळे अशक्तपणा किंवा कोणतेही काम करण्याची ताकद राहत नाही.
कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित न होणे. यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.