Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

मास्क मुक्त कधी होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. ही लाट संपली असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे आता काळजीचा विषय नक्कीच नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना - सध्या राज्यात 9 हजार कोरोनाबाधित (Corona) रुग्ण असून आधी तिसऱ्या लाटेतील कोरोना बाधितांची दररोजची संख्या ही 48 हजारापर्यंत होती.आता आकडा अधिकच खाली आलेला आहे.त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून आता चिंतेचा विषय नक्कीच नाही त्यामुळे ही तिसरी लाट संपली असं माझं वैयक्तिक मत आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.

पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे अशी भूमिका घेऊन चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत. मात्र मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही, हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे देखील पहा -

टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील नागरीकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही.बूस्टर डोस नागरीकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्या प्रमाणे नागरीकांना बूस्टर डोस दिला जाईल असंही टोपे म्हणाले.

मुंबईत कोरोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे.मात्र राष्ट्रीय पातळीवर त्या बाबतचा निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.जालन्यातील पल्स पोलिओ लसीकरण कार्याक्रमाला यायला ईतर कार्यक्रमामुळे उशीर झाला असला तरी लसीकरण सकाळीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही टोपे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

SCROLL FOR NEXT