सुशांत सावंत -
मुबंई : शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, आनंदराव अडसूळ आणि शिवसेना सचिव, महासंघ सरचिटनीस अनिल देसाई उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी केंद्राला टोला लगावला आहे. मराठी भाषेसाठी काम केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, आज आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिवस आहे आज आमची तिसरी पिढी आहे. मी लहानपणापासून या सर्व नेत्यांना मंचावर बघतो इतर पक्ष राजकीय नाटक करत असतात पण आपण एक परिवार असतो मराठीची (Marathi) चिंता दूर ठेवत आजचा दिवस साजरा करण्याचा आहे. ही भाषा कुणासमोर झुकणारही नाही. दिल्लीला झुकवणारी ही भाषा आहे. दिल्लीसमोर आजही आम्ही झुकणार नाही. किती हल्ले केलेत तरी झुकणारा नाही असं म्हणत ठाकरे यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावल.
मरीन लाईन येथे मराठी भाषेची इमारत उभारत आहोत तिथे मराठी परिषदा घेता येतील तसंच मराठी रंगभूमीचे आपण दालन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जास्तीत जास्त शूटिंग आपल्या राज्यात कसे होईल यासाठी आपण काम करतोय. मराठी भाषेच्या शाळा कमी होतात या नेहमीच विषय आहे. हे सत्य आहे मात्र त्याच्यावरती आपण उपाय करत असल्याचं सांगितलं.
लाल किल्ल्यावर शिवसेनेच्या घोषणा -
मुंबई महानगर पालिकेत (Mumbai Municipal Corporation) १२०० शाळा आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या ११ शाळामध्ये सीबीएससी आणि आयसीएससी बोर्ड आणलं आहे. चार हजार जागांसाठी १० हजार अर्ज आले आहेत. या शाळामध्ये १० वी पर्यत मराठी देखील शिकवले जाईल दिल्लीवाले अनेक गोष्टी घेऊन जात आहेत अशी भीती देसाई साहेब आपण व्यक्त केली. पण घाबरू नका आपण २०२४ मध्ये दिल्लीत बसणार म्हणजे बसणार लाल किल्ल्यावर शिवसेनेच्या (Shivsena) अशाच घोषणा ऐकू येतील हे ध्येय घेऊन आपण पुढे जाऊ असही ते यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.