Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News In Marathi: महाराष्ट्राच्या राजकारणात महिनाभरात नेमकं काय घडणार? माजी मुख्यमंत्र्यांनी सगळं काही सांगितलं

Prithviraj Chavan On Ajit Pawar and Eknath Shinde: पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होणार? याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.

Nandkumar Joshi

Ajit Pawar Latest News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होणार? याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांना अजित पवार यांच्या बंडाबाबत कोणतीही कल्पना नव्हती असा मला पूर्ण विश्वास आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 'मला माहीत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेसंदर्भात महिनाभरात म्हणजेच साधारण १० ते ११ ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवले जाऊ शकते. अशात शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे दिले जाऊ शकते.'

कौटुंबिक कलहाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम

पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य केले. इतक्या वर्षांपासून जो कलह सुरू होता, पवार साहेबांनी पक्ष व्यवस्थापनात काही चुका केल्या असतील. कदाचित त्यांनी आपल्या मुलीला राजकारणात पुढे आणण्यासाठी या लोकांना थोडं दूर केलं असावं. मी त्यांच्या कौटुंबिक वादात पडू इच्छित नाही. पण या कौटुंबिक वादामुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम होईलच. त्यामुळेच मी काल म्हणालो होतो की, ही फूट झालेली आहे आणि कौटुंबिक कलह निर्माण झालेला आहे, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT