NAwab MAlik Saam Tv
महाराष्ट्र

Nawab Malik News : नवाब मलिकांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याची चर्चा, पण...

Political news : अजित पवारांनी २ फेब्रुवारीला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी २ फेब्रुवारीला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार जवळपास ३५ ते ४० आमदारांचं अजित पवारांचं समर्थन आहे. मात्र याबाबत ठोस आकडा अजून समोर आलेला नाही. या सर्व घडामोडींदरम्यान अजित पवारांना समर्थन केलेल्या आमदारांच्या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांचं देखील नाव असल्याची चर्चा होती. (Political News)

मात्र मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्याशी सुप्रिया सुळे आणि अजित पवार दोघांनी संपर्क साधला होता. दोन्ही गटाकडून त्यांना विचारणा झाली होती. पण नवाब मलिक तटस्थ असून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे.

नवाब मलिकांवर आरोप काय?

नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. यामध्ये मनी लॅड्रींग केल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  (Latest Marathi News)

कोणत्या मंत्र्यांनी शपथ घेतली

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही शपथ घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT