Wedding Fatal Tragedy Saam Tv
महाराष्ट्र

नवरदेवाचा बूट लपवण्यावरून तुफान राडा; चाकूने सपासप वार, लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार

Wedding fight news : हिंगोलीत लग्न सोहळ्यात नवरदेवाचा बूट लपवण्याच्या वादातून चाकू हल्ला झाला. या घटनेत चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

Namdeo Kumbhar

संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी

Hingoli wedding knife attack over groom shoe ritual : हिंगोलीमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान नवरदेवाचा बूट लपवण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान राडा झाला आहे. सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. मात्र त्यानंतर थेट पोटात चाकूने वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्नात एकच गोंधळ उडाला. या घटनेत वधू आणि वराकडील मिळून चौघेजण जखमी झाले आहेत.

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या कळमकोंडा गावामध्ये घडला. येथे पातळे आणि मेने परिवाराचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील वऱ्हाडी मंडळी या विवाह सोहळ्यासाठी दाखल झाली होती. सकाळी पाहुणे मंडळी आल्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात हा शुभविवाह पार पडला. पाहुण्यांनी जेवणही केले, मात्र कन्यादानाचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन निघण्याच्या तयारीत असताना प्रथा-परंपरेनुसार बूट लपवाछपीचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिथेच हा राडा झाला. या दुर्दैवी घटनेमुळे विवाह सोहळ्याला गालबोट लागले आहे.

याप्रकरणी श्रावण फुलाजी गाढवे यांच्या तक्रारीवरून नवरदेवाकडील दोन जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नवरीकडील तरुण गणेश जगन डाळ (वय २२) याच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू (ICU) कक्षात उपचार सुरू आहेत. या लग्नाची हिंगोलीत जोरदार चर्चा सुरू असून काही व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

बूट लपवल्यानंतर मानपानाच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात नवरदेवाकडील तरुणाने धारदार चाकूने गणेश डाळ याच्या पोटावर वार केले. लग्नमंडपात रक्ताचा सडा पडलेला पाहून वऱ्हाडी मंडळी सैरावैरा धावू लागली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat : पोटावरची अतिरिक्त चरबी वाढवते 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणे पडेल महागात

महाबळेश्वरच्या पिकनिकचा भयानक शेवट! हायवेवर कारचा चक्काचूर, मावळच्या ४ मित्रांचा जागीच मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, गर्दीमुळे हात सटकला अन् थेट खाडीत पडला

Urine Infection : लहान मुलांना युरिन इन्फेक्शन झाले तर शरीर देते 'हे' संकेत; पावसाळ्यात वेळीच उपचार करा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT