Wedding Invitation Maharashtra Government New Rule Saam TV AI Image
महाराष्ट्र

Wedding Invitation : लग्न ठरलंय? मग आधी ही बातमी वाचा! लग्नपत्रिकेबाबत सरकारचा मोठा निर्णय; एका चुकीमुळे बसेल फटका

Maharashtra wedding card new rule : महाराष्ट्र सरकार लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख आणि वय नमूद करणे बंधनकारक करण्याच्या तयारीत आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Wedding Invitation Maharashtra Government New Rule Update: तुमच्या घरात किंवा नात्यात कोणाचं लग्न ठरलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता लग्नाच्या पत्रिकेबाबत राज्य सरकार एक मोठा आणि कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमानुसार, आता लग्नपत्रिकेवर फक्त नवरा-नवरीचं नाव टाकून चालणार नाही. तर त्यांच्या नावापुढे जन्मतारीख आणि वय लिहिणे बंधनकारक असणार आहे.

का घेतला जातोय हा निर्णय?

राज्यात बालविवाहाची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर सरकारला आता जाग आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार, एकट्या परभणी जिल्ह्यात तब्बल ४८ टक्के मुलींचे विवाह हे अल्पवयातच झाल्याचे समोर आले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता, बालविवाहांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी

लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीचं नाव आणि जन्मतारीख टाकण्याचा निर्णय सर्वात आधी राजस्थान सरकारने लागू केला होता. याच निर्णयाचा अभ्यास करून आता महाराष्ट्र सरकारही हा नियम लवकरच लागू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या नियमामुळे लग्नाचे वय कायदेशीर आहे की नाही, हे लग्नपत्रिका पाहताच स्पष्ट होईल आणि बालविवाहांना मोठ्या प्रमाणावर चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यापुढे लग्नपत्रिका छापताना वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार आहे.

बालविवाह कायदा नेमका आहे तरी काय?

देशात 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६' नुसार लग्नासाठी मुलीचे वय किमान १८ वर्षे आणि मुलाचे वय किमान २१ वर्षे असणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात लग्न करणे अथवा करून देणे हा गंभीर आणि कायदेशीर गुन्‍हा मानला जातो. जर कोणी कायद्याचे उल्लंघन करून बालविवाह घडवून आणला किंवा त्याला मदत केली, तर 'बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार' त्याला शिक्षा होऊ शकते. आरोपीला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यामध्ये केवळ लग्न लावणारे नव्हे, तर लग्नाचा सोहळा पार पाडणारे (उदा. पुरोहित, काझी), लग्न ठरवणारे आई-वडील, नातेवाईक आणि लग्नाला उपस्थित राहून प्रोत्साहन देणारे लोक यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT