Weather Alert
Weather Alert  Saam TV
महाराष्ट्र

Weather Updates Today : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; या भागात वादळी पावसाची शक्यता

Satish Daud-Patil

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढउतार होत आहे. परिणामी राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीला आली असताना अवकाळीची शक्यता वर्तवल्याने राज्यातील शेतकऱ्यावर संकट ओढवलं आहे. (Latest Marathi news)

विशेष बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी गारपीट झाली होती. तर मध्य महाराष्ट्रात काही जिह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Updates) पडला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, अवकाळी पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा तापमानात वाढ झाली होती. शनिवारी सांताक्रुझ केंद्रावर सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. कोकणात सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली. आजपासून म्हणजेच १३ मार्चपासून पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  (Weather Forecast

कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?

कोकणासह मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पण, पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घट होणार आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता आहे. तर 14 आणि 15 मार्च रोजी विदर्भातील तूरळख ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे आजपासून (ता. १३) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : धाराशिवमध्ये झालेली हाणामारी वैयक्तिक करणावरून, पोलिसांची माहिती

Blood Pressure कमी झाल्यावर काय खाणे योग्य ठरते

Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

Pudina Sarbat: थंडगार! पुदिना सरबत बनविण्याची सोपी रेसिपी

Konkan Politics: किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गट भाजपमध्ये रंगला कलगीतुरा; अखेर उदय सामंतांनी सांगितला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT