Buldhana News : 'आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा', स्टेटस ठेवत तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन

Buldhana News Today : ज्ञानेस्वर हे संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी असून त्यांनी पुण्यात गळफास घेत आपली जीवयात्रा संपवली.
Buldhana News
Buldhana NewsSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. कर्जाचा डोंगर नापिकी मुलाबाळांचं शिक्षण या तणावातून शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi news)

Buldhana News
Mumbai Crime News : जिथे केली दहशत तिथेच उतरवला माज! भाईगिरीचे क्लास घेणाऱ्या भाईची पोलिसांनी काढली हवा

येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ज्ञानेश्वर वासुदेव मुरुख असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. ज्ञानेस्वर हे संग्रामपूर (Buldhana) तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी असून त्यांनी पुण्यात गळफास घेत आपली जीवयात्रा संपवली.

महत्त्वाचे म्हणजे या शेतकऱ्यांने आत्महत्या करण्याअगोदर व्हॉटसअप वर स्टेटस ठेवले होते. "आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा" असे लिहून त्याने आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अजूनही कळले नसून त्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. (Crime News)

Buldhana News
Aditya Thackeray News : CM म्हणजे ‘करप्ट माणूस, लवकरच खुर्ची जाणार; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याची आत्महत्या

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. असे असताना सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे (वय 28 वर्षे रा.बोदवड ता.सिल्लोड) असे या शेतकऱ्याचं नाव आहे.

कृषीमंत्री सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य!

एकीकडे कृषीमंत्री यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र असे असताना यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com