Weather Updates Monsoon has withdrawn from parts of Vidarbha Marathwada IMD Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Rain in Maharashtra: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये कोसळणार; IMD अंदाज

Monsoon Return in Maharashtra: मुंबई, पुण्यासह नागपुरातून मान्सून माघारी परतल्याचं हवामान खात्याने शुक्रवारी जाहीर केले.

Satish Daud

Monsoon Return Date in Maharashtra

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. मुंबई, पुण्यासह नागपुरातून मान्सून माघारी परतल्याचं हवामान खात्याने शुक्रवारी जाहीर केले. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील ४५ टक्के भागातून मान्सून (Monsoon) निघून गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल. आयएमडीने पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्याचबरोबर राज्यातील इतर भागात हवामान (Weather Updates) कोरडे राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो. यंदा मान्सूनने आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू केला आहे.

आतापर्यंत मान्सून राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परतला आहे. येत्या दोन-तीन दिवसात परतीचा हा प्रवास आणखीन वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज काय?

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहे. दुसरीकडे पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: मुंब्रा येथील इमारतीच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर सिलिंगचे प्लास्टर पडले

Banke Bihari Temple : मंदिरात तुफान राडा, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी; Video Viral

iPhone Discount Price: आयफोन झाला स्वस्त प्रत्येकाचा वाढणार स्वॅग; जाणून घ्या आयफोन १५, १६ प्लसचे नवे दर

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT