weather Alert Heavy Rain of Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Satish Daud

मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आज शनिवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहे. भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी (Maharashtra Rain Update) कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील वातावरण अनेक मोठे बदल होत आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain Alert) सुरू आहे. तर झारखंड आणि बिहारला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. हिमाचलमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा वाढला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय

परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असं आयएमडीने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

आयएमडीने पुढील २४ तासांसाठी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT