Rain Alert Marathwada and Vidarbha  Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: मराठवाड्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा; आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा...

Maharashtra Rain Alert: मराठवाड्यातील काही भागात शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली.

Satish Daud

Rain Alert Marathwada and Vidarbha

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली. (Latest Marathi News)

शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली. काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जवळपास १५ ते २० मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.

आज या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

दरम्यान, आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT