Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

IMD Rain Alert in Maharashtra: येत्या ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Update

राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. काही ठिकाणी गारपीट झाल्याने फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचं हे संकट पुढील दोन दिवस कायम राहणार असून येत्या ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस (Heavy Rain) कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट येईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची (Rain Alert) शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा जिल्ह्याला पावसाला इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येणाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड या भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. 3 मेपर्यंत या भागात उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT