weather Alert Heavy Rain of Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Satish Daud

जून महिन्यात राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तास राज्यात पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर (Maharashtra Weather Update) ओसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट (IMD Rain Alert) देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम घाटत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.

आज या भागात पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिक विभागात तो २८.३४ टक्के पाणीसाठा आहे. चिंताजनक बाब म्हणजे, राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांमध्ये अजूनही एक हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT