Heavy Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Maharashtra Rain News : मान्सून रविवारी (१९ मे) रोजी अंदमानात दाखल झाला आहे. आता ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं आहे.

Satish Daud

दुष्काळ तसेच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदा लवकरच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून रविवारी (१९ मे) रोजी अंदमानात दाखल झाला आहे. आता ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज सोमवार आणि उद्या मंगळवारी देशातील अनेक राज्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामाला लागावे लागणार आहे.

सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान उत्तर प्रदेश, या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार, असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी मान्सून २२ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा ३ दिवस आधीच आला आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भात पाऊस कोसळणार

याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांना देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Live News Update: महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

Shocking: लॉजमध्ये हाई वोल्टेज ड्रामा! नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं, बायकोने चपलेनं चोपलं; VIDEO व्हायरल

गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

SCROLL FOR NEXT