Maharashtra Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : महाराष्ट्रासाठी पुढचे ३-४ तास धोक्याचे, मुंबई पुण्यासह 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Update : येत्या ३-४ तासांत मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

राज्यातील अनेक भागात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. दरम्यान, येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रात धुव्वाधार पाऊस कोसळणारस अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिकडे मराठवाड्यातील ,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याच अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. आता हळहळू मान्सून संपूर्ण राज्याला व्यापणार असून पुढील ४-५ दिवस राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

मुंबईसह उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत परिसरात जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतुकीचा मोठा खोंळबा झाला होता. दादर टीटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. दुसरीकडे पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसला. काही गाड्यात १० ते १२ मिनिटे उशिराने धावत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculator: २० वर्षांसाठी १०,००० रुपयांची SIP करा, अन् महिन्याला ६५,००० मिळवा; सोप्या शब्दात कॅल्क्युलेशन समजून घ्या

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT