Rain In Pune Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: राज्यात पुढील 4-5 दिवस विजांच्या कडकडटासह पावसाचा अंदाज, पुण्याला आज झोडपलं

पुढील चार-पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडटासह पाऊस (Rain) बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Weather Forecast)

बंगालच्या उपसागरात जो प्रभाव तयार झालाय त्यामुळे राज्यात दुपारनंतर पाऊस पडत आहे. सध्या होत असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

पुढील चार-पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुन ते सप्टेंबर दरम्यान राज्यात एकूण 123 टक्के पाऊस पडला आहे. तर देशातील पावसाचं प्रमाण 106 टक्के आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार

पुण्यात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक भागात वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मोठी धावपळ झाली.

रास्तापेठेत झाड पडले

रास्तापेठेत जोरदार वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडलं आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकीवर झाड कोसळले. यामुळे रास्तापेठ मार्ग काहीवेळ बंद झाला होता. अनेक भागांत गुडघ्याच्यावर पाणी साचल्याचं चित्र पुण्यात दिसत होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT