Ashish Shelar : आशिष शेलारांचा 'तो' दावा खोटा, मृत रमेश वळंजू यांचे कुटुंबीय थेटच बोलले

रमेश वळंजू हा कार्यकर्ता भाजपचा होता, असा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला.
Ashish Shelar
Ashish ShelarSaam Tv News

>> संजय गडदे

मुंबई : भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा खोटा दावा रमेर वळंजू यांच्या कुटुंबियांनी समोर उघड केला आहे. वांद्रे बॅंड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलींना वाचवताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वळंजू हा कार्यकर्ता भाजपचा होता, असा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला.

Ashish Shelar
Ajit Pawar : शिंदे की ठाकरे? दसरा मेळाव्यात कुणाचं भाषण ऐकणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मात्र आशिष शेलार खोटं बोलत असून त्यांनी केलेला दावा खोटा असल्याचं मृत रमेश वळंजू यांच्या पत्नी कल्पना वळंजू यांनी सांगितलं आहे. भाजप नेते घाणेरडे राजकारण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Breaking Marathi News)

Ashish Shelar
CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडण? सूत्रांची साम टिव्हीला माहिती

मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड येथे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या काही तरुण-तरुणी समुद्रांच्या लाटात वाहून जात असताना शिवसैनिक व गटप्रमुख असणारे माझे पती रमेश वळंजू यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न मात्र दुर्दैवाने यात माझ्या पतीचे निधन झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विभाग प्रमुख अनिल परब यांनी आम्ही राहत असलेल्या झोपडपट्टीतील आमच्या घरी येऊन आमचे सांत्वन केले. शिवसेनेच्या माध्यमातून मला सारस्वत बँकेत नोकरी मिळाली असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मृत व्यक्तीबाबत अशी खोटी माहिती राजकारणी लोकांनी देऊ नये. माझे पती पहिल्यापासूनच शिवसैनिक होते. कामावरून आल्यावर ते घरी न थांबता स्थानिक शिवसेना शाखेत जाऊन नियमित बसत असे. कधीही भाजप नेते किंवा कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मैत्री देखील केली नाही. असं असताना भाजपचे आमदार आशिष शेलार माझ्या पतीच्या बाबतीत असं खोटं वक्तव्य का करत आहेत? त्यांनी असं राजकारण थांबवावं असंही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com