chhatrapati sambhaji nagar water supply, Water, Water Supply
chhatrapati sambhaji nagar water supply, Water, Water Supply saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News : सिडको- हडको भागांसह संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट; नव्या जलवाहिन्यांची गरज

डाॅ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल आहे. चार दिवसाआड मिळणारं पाणी आता सहा दिवसाआड मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर येथे चार दिवसांपूर्वी पैठण रस्त्याच्या कामात जेसीबीचा धक्का लागल्याने जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फुटला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी सात तासांचा कालावधी लागला. या काळात जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी पहाटे शहरात पाणी आल्यानंतर जलकुंभ भरण्यास तीन ते चार तास लागले. त्यामुळे त्या दिवशी असलेले पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले. चार दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन असतानाही पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

नव्या जलवाहिन्यांची गरज

परिणामी नागरिकांना सहा दिवसांआड पाणीपुरवठा हाेऊ लागला आहे. विशेष म्हणजे सिडको- हडको भागांसह शहराच्या उर्वरित भागांत पाण्याची ओरड सुरू झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्या कधी फुटतील, कधी त्यांना गळती लागेल, याचा नेम राहिलेला नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT