Buldhana Water Crisis:  Yandex
महाराष्ट्र

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Buldhana Water Crisis: सध्या जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू आहेत. तसेच आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. ४ मे २०२४

बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टँकरग्रस्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू आहेत. तसेच आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसताना दिसत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून, टैंकरग्रस्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ४६ गावांना ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. गेल्या चार वर्षातील टैंकरग्रस्त गावांची ही वर्तमान स्थितीत सर्वाधिक संख्या आहे.

त्यामुळे येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. मधल्या काळात जिल्ह्यात दुपटीने टँकरची संख्या वाढली होती. ही परिस्थिती पाहता मे अखेर जिल्ह्यात ८२ च्या आसपास गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. टंचाईच्या दृष्टीने आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत आहे. १३६ गावांसाठी २६८ विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.

एकट्या देऊळगाव राजात २८ गावांसाठी तब्बल ५२ विहीर आधार बनल्या आहेत, तर मेहकर तालुक्यात ४६ गावांसाठी ४७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त शेगाव, मोताळा, चिखली, बुलढाणा, लोणार या तालुक्यात पाणीपातळी प्रचंड खाली गेल्यामुळे येथे मे महिन्यात टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

SCROLL FOR NEXT