water scarcity in loha near nanded news sml80 Saam Digital
महाराष्ट्र

Nanded Sunegoan Talav : लाेहा शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट

Loha City : दिवाळी नंतर नगरपालिकेतील कारभाऱ्यांनी शहरातील पाणी पुरवठ्यासाठी नियोजन केले नाही. शिवाय गेल्या महिन्यापासून पालिकेत प्रशासक पद रिक्त आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात केवळ 15 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. याच तलावातून लगतच्या नऊ गावांना जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा लिंबोटी धरणातून अद्याप तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे लोहा शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

दरम्यान याच तलावातून शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी सुरू आहेत. त्या बेकायदेशीर पाणी उपसावर जलसंपदा विभाग, नगर परिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

सुनेगाव तलावातून लोहा शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात तलाव पूर्णतः भरला नाही. शहरासाठी पाणी आरक्षण दीड दलघमी इतका पाणीसाठा लिंबोटी धरणात राखीव करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळी नंतर नगरपालिकेतील कारभाऱ्यांनी शहरातील पाणी पुरवठ्यासाठी नियोजन केले नाही. शिवाय गेल्या महिण्यापासून पालिकेत प्रशासक पद रिक्त आहे. मुख्याधिकारी हे प्रभारी आहेत. पाणी पुरवठा अभियंता पद देखील गेल्या सहा महिन्या पासून रिक्त आहे.

या परिस्थितीत शहरासाठी उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक असताना कुठल्याही हालचाली अद्याप होताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ उपाययोजना करून लोहा शहराची पाणी टंचाईची समस्या सोडवावी अशी मागणी लोहा शहरातील नागरिक करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT