Lakhandur, Water Scarcity saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : लाखांदूर तालुक्यातील 'या' गावात दीड महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई; प्रशासन मार्ग काढेल का ?

पुर्वी चुलबंद नदीपात्रातून पाण्याचा उपसा करून पाणी घेतले जायचे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर (lakhandur water scarcity) तालुक्यातील मडेघाट गावकऱ्यांना गेल्या दीड महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांना भर उन्हात बोरवेलचे पाणी भरावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन मार्ग काढावा अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. (Maharashtra News)

मडेघाट गावात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावात दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. गावात २८० नळ कनेक्शन देखील देण्यात आले. पण गावातील काही नागरिक नळाला मोटर पंप लावून पाणी खेचून घेतात. परिणामी अन्य गावकऱ्यांच्या नळाला पाणीच (water) मिळत नाही.

गेल्या दीड महिन्यांपासून गावकरी कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. मागील ३-४ वर्षांपूर्वी गावातील टाकीत लाखांदूर येथील चुलबंद नदीपात्रातून पाण्याचा उपसा करून पाणी घेतले जायचे.

त्यावेळी पाईपलाईन व्यवस्थित नसल्याने योजनेतून गावातच बोरवेल तयार करण्यात आली. आता त्यातूनच गावच्या टाकीत पाणी येते. गावातील उंच भागात असलेल्या वार्ड क्रमांक एक व वार्ड क्रमांक दोन मधील काही भागात पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे महिलांना भर उन्हात बोरवेलच्या पाण्याचे साह्य घ्यावे लागते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT